जनतेज न्युज

वणीच्या शेतकरी पुत्राने बनवली स्वयंचलित ‘सोनिक कार’

प्रतिनिधी, यवतमाळ : यवतमाळ जिल्हा हा शेतक-यांच्या दृष्टीने आत्महत्याग्रस्त म्हणुन ओळखला जातो. याच जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने भन्नाट कल्पनेतून स्वयंचलित हायट्रोजन ‘सोनिक कार’बनवली आहे. केवळ १५० रुपयात २५०ते३०० किलो मिटरचा प्रवास करता येणार आहे. सध्याच्या काळात वाहन वापरणा-यांची संख्या वाढली असून, दररोज हजारो वाहने रस्त्यावरून धावत आहे. वाहनातून निघणा-या धुरामुळे प्रदुर्षन वाढले असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच पेट्रोल व डिजेलचे दर १२० रुपयावर पोहचले आहे. यावर उपाय म्हणून वणी येथील हर्षल नक्षणे नामक युवकाने आपल्या कुणाल आसुटकर नावाच्या मित्राच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषण मुक्त स्वयंचित ‘सोनिक कार’ तयार केली आहे. हर्षलने एम टेक पर्यंत शिक्षण घेतले आहे. या युवकाचे एक स्वप्न होते की, भारताकडे स्वत:ची अशी सुपरकार असली पाहिजे. जी शून्य प्रदूषण करते आणि स्वत: धावण्यासाठी सक्षम असली पाहिजे. परवडणाऱ्या किमतीत ग्रीन हायड्रोजन ऊर्जा वापरणे आणि अपघात आणि मानवी चुका कमी होईल अशी कार हवी. त्या दृष्टीकोणातून हर्षल नक्षणे याने एक नावाने कंपनी रजिस्टर केली आहे. कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत भाग तीन ला शिक्षण घेत असलेल्या बालपणीच्या मित्राच्या मदतीने कार बनविण्याचे काम सुरु केले. गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे . ड्रायव्हरविना ही कार चालणार आहे. आपल्या ज्या मार्गाने व ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग निवडा त्या ठिकाणी ही कार पोहचणार आहे.एक लिटर हायट्रोजन (किंमत १५० रुपये) मध्ये २५०ते३०० किलो मिटर धावणार आहे. त्यामुळे पेट्रोल व डिजेलवर चालणा-या वाहना पासून सुटका होणार आहे. या कारने कुठल्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही. ही सुपर कार तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग वणीतच तयार केले आहे. फक्त कारसाठी लागणारे काच व टायर ह्या वस्तू अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर ही कार तयार कली असून, त्यासाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च आला आहे. इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशातून ही कार बनविल्याची माहिती हर्षल नक्षणे यांनी दिली. सेल्फ ड्रायव्हींग व हायट्रोजन फ्युल सिंसटमचे पॅटेट नोंदणी केली आहे. १०० कार तयार झाल्यानंतर ही कार विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. सामान्य लोकांना ही कार परवडेल, यासाठी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्वाधिक प्रदूषण पेट्रोल, डिझेलमुळे होते. शिवाय एका लिटरचे भाव आवाक्याबाहेर गेले आहे. एक लिटर हायट्रोजन किंमत १५० रुपयात २५०ते३०० किलो मिटर कार धावणार आहे. सामान्य लोकांना ही कार परवडेल, यासाठी खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच ही कार तयार झाली आहे. हायट्रोजन गॅसवर चालविणारी ही कार आहे. सेल्फ ड्रायव्हींगसाठी संगणक तयार केले आहे . ड्रायव्हरविना ही कार चालणार आहे. आपल्या ज्या मार्गाने व ज्या ठिकाणी जायचे आहे तो मार्ग
निवडा त्या ठिकाणी ही कार पोहचणार आहे. वणी शहरात ही कार बनवण्यात आली आहे. हर्षल स्वभावाने प्रेमळ आहे. लहान मुलांसोबत खेळण्यात त्याला आनंद मिळतो. गाडी बनवणार असे त्याने आम्हाला सांगितले होते. कारचे अर्धे काम घरीच केले. त्याने स्वतः काम करत पैसे कमवुन ही कार बनवली आहे.