प्रतिनिधी , सातारा : साताऱ्यातील कास पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेल्या कास महोत्सवाकडे सातारच्या लोकप्रतिनिधिंसह पर्यटकांनी अक्षरशा पाठ फिरवली आहे तर या कास महोत्सवाला स्थानिकांना सहभागी करून न घेतल्याने त्यांनी देखील या महोत्सवाला कडून विरोध दर्शवला आहे. सातारा जावली चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील कालच प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत जाहीरपणे या कास महोत्सवाला विरोध दर्शवला होता स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात न घेता हा कास महोत्सव खाजगी व्यवसायिकाच्या माध्यमातून केला जात आहे त्यामुळे शासनाने हा महोत्सव आपल्या माध्यमातून करावा अशी मागणी देखील त्यांनी काल केली होती त्यामुळे पर्यटन वाढीसाठी सुरू केलेला कास महोत्सव पहिल्याच वर्षी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे देखील समोर आले आहे. शनिवारी आणि रविवारी कासला फुले पाहण्यासाठी जाणाऱ्यांची मोठी संख्या असते याच धर्तीवर कास महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते आज व उद्या देखील कास फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे बुकिंग फुल झाले आहे मात्र तरी देखील कास महोत्सवाला गर्दी होऊशाकली नाही. लाखोंचा खर्च करून ही कास महोत्सव का यशस्वी झाला नाही याची कारणे देखील जिल्हा प्रशासनाने शोधावीत आणि स्थानिकांना हाताशी धरून हा कार्यक्रम यापुढे करावा अशी मागणी स्थानिक करू लागले आहेत.
