प्रतिनिधी , अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुका येथील सावंगी प्रकल्पाचे पाणी लगतच्या नाल्या मधून शेतकऱ्यांच्या शेतात बॅक वॉटर येत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतातील कपाशी तूरीचे पीक पाण्यामुळे संपूर्ण खराब होऊन त्यांचे नुकसान होत असल्याने त्यांनी वारंवार प्रशासनासोबत पत्रव्यवहार करूनही त्यांना अजून पर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. व जमिनीचे अधिग्रहण केले नाही.जलसंपदा विभाग तहसीलदार यांच्याकडून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तर मिळाली असून त्यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने आज त्यांनी थेट जिल्हा अधिकाऱ्यांच्या जालना बाहेर अजून आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी यांनी आज शेवटची मीटिंग बोलावली होती मात्र ती मिटींगही अजून घेतली नसल्याने शेतकरी संतापले आहेत.
