प्रतिनिधी, अमरावती : अमरावती महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक राज आहे. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रशासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा असतो नगरसेवक, आता नगरसेवकच नसल्यामुळे नागरिकांनी त्यांच्या समस्या कुणापुढे मांडायच्या? असा प्रश्न सर्वांनाच पडलां आहे. अमरावतीच्या जिजाऊ नगरातील नागरिक गेल्या दिड वर्षांपासून सांडपाण्यामुळे त्रस्त आहेत, या परीसरात साचलेल्या सांडपाण्यामुळे परीसरात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. या साचलेल्या पाण्यात विषारी साप असल्याने इथल्या नागरिकांना जिव धोक्यात घालूनच परीसरात वास्तव्य करावे लागत आहे. या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही प्रशासनाने या सांडपाण्याच्या विल्हेवाटीकडे लक्ष दिले नाही. त्यामळे यापुढे काही अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
