जनतेज न्युज

ए.सी.बीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार कोण आहे याची चौकशी केली पाहिजे – आ. नितीन देशमुख

प्रतिनिधी , अकोला : उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना अमरावती ACB नोटीस बजावली आहे..यात त्यांना 17 तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले असून मालमत्ता संदर्भात त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण नेमकी यासंदर्भात तक्रार कोणी दिली.हे मला माहित आहे. असा आरोपही नितीन देशमुख यांनी केला आहे. तर ही तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यायला लावली असल्याचा आरोपही यावेळी केला असून मला नाव माहित आहे कन्फर्म झालं तर मी लवकरच मुख्यमंत्री आणि समोरच्याची ऑडिओ क्लिप जनतेसमोर आणण्याचा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.