प्रतिनिधी , जालना : बेपत्ता झालेल्या दोन तरुणांना शोधण्यात सदर बाजार पोलिसांना यश आलं आहे.राजस्थानमधून या तरुणांना ताब्यात घेण्यात आलं असून अशोक बडे आणि किरण शेवाळे अशी या तरुणांची नावं आहेत.5 जानेवारी रोजी दोन तरूण हरवल्याची तक्रार संतोष डोंगरे सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला होता.वाघ यांनी राजस्थान गाठून या मुलांना ताब्यात घेतलं.हे दोन्हीही तरुण जालन्यात राहणाऱ्या एका महिलेचं राजस्थान मधील तरुणाशी लग्न झालं.मला राजस्थानला घेऊन जात आहे.अशी माहिती या महिलेनं या दोन्ही तरुणांना दिली.या महिलेच्या शोधात हे दोन्हीही तरुण राजस्थानला गेल्याची माहिती पोलीस तपासा दरम्यान समोर आली आहे.मात्र दोन्हीही भाच्यांचा शोध पोलीस तपासा दरम्यान लागल्याने कुटुंब आनंदीत झालं आहे.
