जनतेज न्युज

शिक्षक पदवीधर निवडणुकीवर शिक्षकांचा बहिष्कार

प्रतिनिधी , जालना : शिक्षक पदवीधर निवडणुकीवर शिक्षकांनी बहिष्कार घातल्याची भूमिका जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक कृती समितीनं घेतलीये आहे. जालना जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे शिक्षकांनी रोष व्यक्त केलाय. शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं 28 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केलेली अधिसूचना रद्द करावी आणि राज्यातील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती व मर्यादीत विभागीय परीक्षेसाठीची संधी पूर्ववत कायम ठेवणे या मागण्यांसाठी शिक्षकांनी आगामी पदवीधर निवडणुकीवर बहिष्कार घातलाय. या बहिष्कारात राज्यभरातील 32 हजार शिक्षकांनी सहभाग घेतल्याचीही माहिती शिक्षक कृती समितीनं दिलीये.