जनतेज न्युज

शीक्षणाच्या आड कधीही पैसा येत नाही, तिनी गाठले यशाचे शिखर

प्रतिनिधी, यवतमाळ : वर्धा जिल्हातील आर्वी तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुस्कान ने बुद्धिमत्ता व मेहनतीच्या जोरावर नामवंत बनारस हिंदू विश्वविद्यालयातील भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी बनारस येथून पदवी प्राप्त करून आर्वी शहरात तील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटविला काही प्राप्त करण्याची जिद्द असेल तर शिक्षणाच्या आड कधीही पैसा येत नाही हे मुस्कान कुळमेथी हिने घरची परिस्थिती हलाखीची असताना करुण दाखवले. वडील हे एका ऑर्केस्ट्रा मध्ये संगीत यंत्र वादक आहे व आई आणावाडी मदतनीस असताना शिकण्याची जिद्द आणि चिकाटी असलेल्या मुस्कानेआज आय आय टी वाराणसी येथून बी टेकची पदवी मिळवली. मुस्कान हिने 2010 मध्ये नवोदयच्या परीक्षेत यश प्राप्त केले व दहावी पर्यंत वर्धा नवोदय येथे शिक्षण घेतले व 11 वि आणि 12 वि पुणे नवोदय येथून केले व सोबतच दक्षणा फौंडेशन च्या मदतीने आय आय टीची कोचिंग घेऊन जे ई ई परीक्षा पास करून बनारस हिंदू युनिवार्सिटी बी टेक ची पदवी प्राप्त केली आहे.आई-वडील व शिक्षकाना दिले प्रोत्साहनामुळे मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त होऊ शकले असे मुस्कान ने सांगितले पुढे एमबीए करायचा मानस तिने याप्रसंगी व्यक्त केला. मुस्कान ने एका नामवंत विश्वविद्यालयातून पदवी प्राप्त केल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे . तीचा गुनगौरव केला गेला अIहे .