प्रतिनिधी, जालना:जालना शहरात आज हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा शहरातील मामा चौक येथून निघून सिंधी बाजार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी येऊन संपन्न करण्यात आला यावेळी महिला तरुण तरुणी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ श्रद्धा वायकर हिला श्रद्धांजली वाहण्यात आली तरुण मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या भावना व्यक्त केल्या तरुण मुलींनी आपल्या विरंगणांचा आदर्श घ्यावा आपली संस्कृती व आपला धर्म आबादीत राहिला पाहिजे यासाठी आपणच पुढाकार घ्यायला पाहिजे व लव जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये सरकारने कडक कायदे करावेत व लवकरात लवकर श्रद्धा वायकर हिच्या मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या सभेतून व मूक मोर्चातून करण्यात आली यावेळी तरुणांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
