जनतेज न्युज

शिवसेना युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी; शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची घोषणा

प्रतिनिधी , औरंगाबाद :  आज शुक्रवार 15 जुलै रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेच्या निष्ठा मेळाव्यामध्ये शिवसेनेचे युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेने विरुद्ध व पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने त्यांची आज शिवसेनेतून हकलपट्टी करण्यात आली आहे,

अशी घोषणा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज रोजी केली आहे,राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटाला समर्थन दिल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे,

आज मुख्यमंत्री यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला मुंबई येथे पहिल्या रांगेत राजेंद्र जंजाळ हे बसल्याचे दिसून आले,याची दखल आदित्य ठाकरे यांनी सुद्धा घेतली असून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा आज रोजी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बंडखोरी नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले असून आता स्थानिक कार्यकर्तेही काही प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळत आहे मात्र अशा कार्यकर्त्यांची शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात हकालपट्टी करण्यात येत असून त्याचे मोठे उदाहरण आज औरंगाबाद शहरातील शिवसेनेचे युवा सेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.