जनतेज न्युज

समाजसुधारकांचे वेशभूषा केलेले रिंगण ठरले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आकर्षण

प्रतिनिधी , अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील श्री संत ज्ञानेश्वर माउली विद्यालयात आज १५ऑगस्ट भारताचा 75 वा स्वातंत्र्य उत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अगदी थाटामाटात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न करण्यात आलाय.श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय 75 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या समाजसुधारकांच्या वेशभूषा करून गोल रिंगण करत अनोख्या पद्धतीने भारतमातेला वंदन केले आहे.श्री.संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय विद्यार्थ्यांना राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक व अभिनंदन होत आहे..कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल कडलग यांनी केले तर अध्यक्षीय भाषण बाबासाहेब कडनर यांनी केले तर सूत्रसंचालन बी आर पिंगळे यांनी मानले तर आभार शशिकांत खोजे यांनी तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असल्याचे मुख्याध्यापक यांनी बोलताना सांगितले आहे.