प्रतिनिधी , जळगाव : आज 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचा 75 वा वर्धापन दिन , या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय पावसात झेंडावंदन पार पडले, यावेळी जिल्हा पोलिस दलाच्या सशस्त्र जवानांनी ध्वजाला सलामी दिली व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडावडवन करून त्यानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली, यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावली झेंडावंदन समारंभानंतर सामाजिक व राजकीय क्षेत्रात उच्च कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना तसेच उपस्थित जेष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
