प्रतिनिधी, मुंबई : 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन मध्ये रेल्वेच्या माध्यमातून आखण्यात आले आहे. या अनुषंगाने या दोन्ही वंदे भारत ट्रेनच्या चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत. या वंदे भारत ट्रेन मुळे मुंबईहून शिर्डी आणि सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. यामुळे राजधानी मुंबईला जलद कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. सी एस एम टी शिर्डी या वंदे भारत ट्रेन मुळे मुंबईमधील साई दर्शनाची इच्छा असलेल्या भाविकांना मात्र एका दिवसात साई दर्शन करता येणार आहे. शिवाय मुंबई सोलापूर या ट्रेनमुळे सोलापूर वासियांना मोठा फायदा होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही ट्रेन पुणे मार्गे धावणार असल्याने याचा पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. या ट्रेनला एकूण 16 डब्बे जोडलेली आहेत यापैकी दोन डबे हे विशेष कोच साठी आहेत कमी वेळामध्ये शिर्डीला पोहोचवणारी ट्रेन आहे विशेष कोच डब्यामध्ये लाभार्थ्यांना आनंदमय आणि रिलॅक्स अश्या चेअर बसविण्यात आल्या आहेत ट्रेनमधील प्रवाशांना आनंदमय आणि आरामदायक अशा विशेष व्यवस्था या ट्रेनमध्ये करण्यात आलेली आहे. 10 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेने या दोन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्याचे योजिले आहे. या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना देखील पूर्ण झाल्या आहेत.
