जनतेज न्युज

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पायी रॅली, सरकारी अधिकारी माजी सैनिकाचा उपक्रम

प्रतिनिधी, नंदुरबार : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शहादा तालुक्यातील सर्व अधिकारी सरकारी कर्मचारी, माजी सैनिक तसेच  नागरिकांनी एकत्र येत आज महाराष्ट्रा ते मध्य प्रदेश सीमेपर्यंत 7 किलोमीटर पदयात्रा काढली. या पदयात्रेत सर्व स्तरातील नागरिकांनी अधिकारी एकत्र आले होते. यावेळी महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर ध्वजारोहण करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला तसेच ग्रामीण भागातून घरघर तिरंगा या संदर्भात जनजागृती  करण्यात आली. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशाचा स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती, त्यांना अभिवादन करण्यात आले.