प्रतिनिधी,अमरावती:खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अभिनंदन केले. मात्र गेल्या अडीच वर्षात कारवाया झाल्या नसल्याची खंत देखील व्यक्त केला आहे. गृहमंत्री बदलताच कारवाई होत आहेत. त्यामुळे अमरावतीत गोवंश कसे येतात याची सुद्धा चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी बोंडे यांनी केली आहे. याशिवाय ज्या गोडाऊन मध्ये गोवंश सापडलेत त्या जागेवर बुलडोझर चालवायला पाहिजे आणि यावर कठोर कारवाई अपेक्षित असल्याची मागणी देखील केली आहे.
