जनतेज न्युज

राज्यपालांनी त्यांच्या वक्तव्यातुन कायम भाजपचा प्रचार केला – शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे

प्रतिनिधी, पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईला बोचरणारी अशी टीका केली आहे ,मुंबई मधून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेला तर मुंबई ही आर्थिक राजधानी ओळखली जाणारी नाही !.. असे वादग्रस्त व्यक्तव्य राज्यपाल यांनी केलं आहे. या व्यक्तव्य विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. आंदोलनाच्या भूमिकेतून र राज्यपालांना भाजपाल संबोधला आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा अशी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे या आधी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मध्ये एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विषय अनुद्गार काढले होते, त्यांच्या तारुण्य विषय अतिशय घाणेरडं वक्तव्य राज्यपालकडून करण्यात आला होता. नेहेमी अशी वादग्रस्त व्यक्तव्य करण्यासाठी हे राज्यपाल फार प्रसिद्ध आहेत. राजपाल यांनी कायमच भाजपचा प्रचार करणं हे सयुतीक आहे का ? हे राष्ट्रपतींनी त्यांना विचारावं आणि त्यांना महाराष्ट्रातून सेवानिवृत्त कराव.अशी भूमिका शहर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सगळे गुजराती,राजस्थनी गुन गुणाने राहत मात्र अश्या प्रकारची व्यक्तव्य करून जाती जाती मध्ये टेड निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यपाल करत आहे.याचा निषेध केला आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या महाराष्ट्रातून निघून जावं “चले जाओ राज्यपाल अशी भूमिका या आंदोलनातून व्यक्त केले. राज्यभरातून राजपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यचा निषेध नोंदवला जात आहे. आज पुण्यात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून याचा निषेध व्यक्त केला. मात्र राज्यपाल हे नेहेमी भाजपच्या भूमिकेचं समर्थन करतात म्हणून त्यांच्या उल्लेख देखील भाजपाला असं करण्यात आला आहे