जनतेज न्युज

UPA अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्र.

प्रतिनिधी , UPA अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पत्रावर स्पष्टीकरण दिले आहे, महाविकास आघडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस च्या अध्यक्षणी पत्र लिहिलं असल्याने या पत्राचा नेमका अर्थ काय घ्यायचा यावर राजकीय क्षेत्रातील अनेक विचार समोर येत आहे, मात्र थेट सोनिया गांधीना पत्र लिहायची वेळ आल्याने महाविकास आघाडीमध्ये सगळंच आलबेल नाही हे सांगायची गरज पडणार नाही, मात्र घरातील जेष्ठ व्यक्ती सूचना करत असेल पत्राच्या माध्यमातून करत असेल तर त्याच स्वागत करून त्यावर चिंतन करण्याची गरज असल्याचे नितीन राऊत म्हणाले, सोनिया गांधीच पत्र भविष्यातील काँग्रेस चा अजेंडा असल्याचं देखील नितीन राऊत सांगायला विसरले नाही. याचा महाविकास आघाडीला राजकीय अर्थ गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे हे निश्चित…