जनतेज न्युज

वाईन शाॅप व्यवस्थपकाचा धारदार शस्त्राने खुन; पासासाठी पोलिस पथके रवाना

प्रतिनिधी, नांदेड : नांदेड मध्ये वाईन शाॅप व्यवस्थापकाचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आल्याने खळबळ उडाली. शहरातील ढवळे काॅर्नर परिसरात येथे काल रात्री ही घटना घडली. माधव जीवनराव वाकोरे असं खुन झालेल्या व्यवस्थापकाच नाव आहे.दारुच्या पैश्याच्या कारणावरुन काही तरुणांसोबत वाईन शाॅपचे व्यवस्थापक माधव वाकोरेचा वाद झाला.त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा तरुणांचे टोळके वाईन शाॅपवर आले आणि वाकोरे यांना मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले. जखमी वाकोरे ला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी अज्ञात मारेकरां विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मारेकऱ्यां च्या तपासात पथके रवाना केली आहेत. वाईन शाॅप हा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे यामध्ये एकूण सहा आरोपी असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उर्वरित तीन आरोपींचा शोध घेणे चालू आहे अशी माहिती पत्रकारांशी बोलताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय अशोक भोरबांड यांनी ही माहिती दिली.