जनतेज न्युज

वन बुलढाणा मिशनच्या वारीत अध्यात्म आणि विकासाचा गजर

प्रतिनिधी, बुलडाणा : दरवर्षी आषाढी एकादशीला जिल्ह्यातील लाखो भाविक पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला जात असतात. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून संदीप शेळके यांच्या नेतृत्वात साडेतीनशे युवक- युवती वारीत सहभागी झाले आहे..अभंग, भजन, विणा, टाळ, मृदुंगाची साथ देत वारकरी तरुणाई देहभान विसरली.6 तासांत 23 किलोमीटरचे अंतर पूर्ण केलेल्या या पायदळ वारीत अध्यात्मासह विकासाचा गजर बघायला मिळाला.. पायदळ वारीतील महिलांच्या सहभागाने प्रामुख्याने लक्ष वेधले आहे.नियम आणि शिस्त पाळत वारकरी तरुणाईने सेवाभावाचा संदेश यावेळी दिला आहे.