जनतेज न्युज

अमली पदार्थ विरोधात जिल्हा पोलीस दल सरसावले

प्रतिनिधी, नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा अमली पदार्थ विरुद्ध जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा पोलीस दल सरसावले असून पोलीस दलातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आज पोलीस दलातर्फे अमली पदार्थ दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळकरी मुलाची रेली काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी हिरवा झेंडा  दाखवून रॅली ला सुरुवात करण्यात आली. या रॅलीत अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व विद्यार्थी सहभागी झाले.  जिल्ह्यात कोणताही प्रकारचा अमली पदार्थ बाळाला जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्हा अमली पदार्थ मुक्त जिल्हा बनला असून अमली पदार्थ मिळून आल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. अमली पदार्थाची विक्री, वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यातून अमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी बोलताना सांगितले.