जनतेज न्युज

कोणत्याही धर्माच्या भावना न दुखवता जिल्ह्यात ईद दिवशी कुर्बानी होणार, मुस्लिम समाजाचा निर्णय

प्रतिनिधी, बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणत्याही धर्माच्या भावना न दुखावता ईदच्या दिवशी कुर्बानी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काही मुस्लिम समाजातील संघटनेंनी कुर्बानी देण्यास नकार दिला. मात्र आम्ही बंधुत्वाने ईदही साजरी करू आणि एकादशी ही साजरी करू, असे एकमत या बैठकीतून घेण्यात आले. बीड येथील मजलीस ए ओलेमा जमीयतुल ओलोमा आणि सामाजिक संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.