जनतेज न्युज

वरणगावच्या चिमुकल्यांनी घेतली पोलीस स्टेशन मधल्या कारभारांची माहिती

प्रतिनिधी, जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ईरा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज वरणगाव पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस स्टेशन मधल्या साहित्याची माहिती घेतली व पोलीस स्टेशनच्या कारभाराविषयी माहिती जाणून घेतली.ईरा इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज वरणगाव येथील पोलीस स्टेशनला भेट दिली या भेटीमध्ये हातकडी ,रायफल, वाकी टाकी, वायरलेस यंत्रणा ,कारागृह, इत्यादी बाबतची माहिती जाणून घेतली व पोलीस स्टेशनचे कसे कामकाज चालते याविषयी चिमुकल्याने माहिती जाणून घेतली इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यात येत असतात त्यातलाच हा एक आजचा भाग होता, लहान मुले पोलीस म्हटलं की घाबरून जातात परंतु हीच मुले पोलीस स्टेशनच्या आवारात आल्यानंतर यांच्या मनातील भीती पोलिसांनी दूर केली,