प्रतिनिधी, अमरावती : अमरावतीच्या अंबा देवीला विदर्भाचे कुलदैवत संबोधल्या जाते.त्यामुळे नवरात्रा मध्ये भाविक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, आज पासून नवरात्रोत्सव सुरू झाल्याने पहाटे आर्ती करून मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली आहे,देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या नऊही दिवस भाविकांची अलोट गर्दी उसळते. राजकमल चौक ते गांधी चौक दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त मोठी जत्रा भरते. विशेष म्हणजे पहाटे चार वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत अनवायी पायाने देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने नवरात्रोत्सव काळात पहाटेपासूनच अमरावती शहर अगदी गजबजून गेलं आहे तर रात्री अंबादेवी व एकवीरा देवीच्या दोन्ही मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली
