जनतेज न्युज

विठुरायाच्या महापूजेचा मान मिळालेले नवले दाम्पत्य मूळ गावी परतले; बीडकरांनी जल्लोषात केलं स्वागत

प्रतिनिधी, बीड : यंदाच्या आषाढी एकादशी निमित्त नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावच्या नवले दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. दरम्यान ही वारी झाल्यानंतर नवले दाम्पत्य आज त्यांच्या मूळ गावी बीडमध्ये पोहोचल आहे. बीडकरांनी देखील त्यांचं स्वागत करत सन्मान केला. भाविक राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी नवले दांपत्याचा सन्मान करत विठूरायाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई हे शेतकरी दाम्पत्य शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. 1987 पासून त्यांची वारीची परंपरा सुरू असून यंदा माञ त्यांना हा बहुमान मिळाल्याने बीडकरांना देखील त्यांचा अभिमान वाटतोय. त्यामुळेच या दांपत्याच मोठ्या हर्षउल्हासात स्वागत केले गेलं.