प्रतिनिधी, औरंगाबाद : आज गुरुवार 9 जून रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात अटल समाज सेवा संघाच्या वतीने भाजपाचे प्रवक्ता नूपुर शर्मा यांनी मुस्लिम धर्मगुरू यांच्या बद्दल वापरलेल्या अपशब्दाचा विरोधात आज अटल समाज सेवा संघाच्या वतीने क्रांती चौकात मोठे आंदोलन करण्यात आले असून या घटनेचा भाजपाचा निश्चित करण्यात आला आहे . यावेळी भाजपाच्या प्रवक्ता यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन घेण्यात आले यावेळी अटल समाज सेवा संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केंद्र शासनाच्या विरोधात आणि भाजपाच्या विरोधात मोठ्या घोषणा दिल्या आहे. सदरील आंदोलन आज रोजी क्रांती चौकात संपन्न झाले आहे.
