जनतेज न्युज

अनैतिक संबंधांतुन झाली विहानची हत्या बिंग फूटण्याच्या भितीपोटी केली हत्या आरोपीची कबूली

प्रतिनिधी , आंधळगाव: आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या सालेबर्डी येथील ६ वर्षीय विहान या चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा करण्यात भंडारा स्थानीक गुन्हे शाखा व आंधळगाव पोलीसांना यश आले असुन विहानच्या मारेक-याला अटक करण्यात आली आहे.आईचे गावातीलच मुलाशी असलेल्या अनैतिक संबंध उघड होण्याच्या भितीपोटी विहानचा खुन केल्याची कबुली आरोपी निलेश चंदन गजभिये वय २३ वर्षे याने पोलीसांना दिली आहे.
सालेबर्डी येथील विहान राजेंद्र लांजेवार हा ६ वर्षाचा मुलगा दिनांक २२ नोव्हेबर २०२० रोजी अचानक बेपत्ता झाला. स्थागुशा व आंधळगाव पोलीसांनी संपुर्ण परीसर पिंजुन काढला मात्र विहानचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान पोलीसांनी तिन दिवसानंतर संशयीत आरोपी निलेश चंदन गजभिये वय २३ वर्ष रा. सालेबर्डी, ता. मोहाडी, जि. भंडारा याला ताब्यात घेवुन त्याची चैकशी केली असता त्याच्या बयानात तफावत आढळुन आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हृााची कबुली देत विहानच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंध उघड होवु नये याकरीता विहानचा खुन करून
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देषाने प्रेत पहेला जंगलातील चैवा मेंढा रोडवरील चैवा नाल्याच्या पुलाच्या रपटयातील पायलीत फेकल्याची कबुली दिली.