प्रतिनिधी , अमरावती : केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमरावतीत युवक काँग्रेसने केंद्र सरकारची जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रेतयात्रा काढली यावेळी आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला, दिल्लीत 12 दिवसापासून शेतकरी आंदोलन करीत आहे, मात्र याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे तर उद्या भारतबंदची हाक देण्यात आली असून अमरावतीत आज पासून आंदोलनाला सुरवात करण्यात आली आहे युवक काँग्रेसने मोदी सरकारची जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रेतयात्रा काढली यावेळी तिरडी घेऊन केंद्र सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली
