प्रतिनिधी , बुलडाणा : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपसी मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ग्रामविकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही असी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे केले
बुलढाणा जिल्ह्यातील 527 स ग्रामपंचायतीच्या निवडणुकापैकी 29 ग्रामपंचायतीच्या निवडणूका अविरोध झाल्या तर उर्वरित 498 ग्रामपंचायती साठी निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा महाविकास आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आमदार राजेश एकडे माजी आमदार राहुल बोंद्रे हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार उपस्थित होत्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महा विकास आघाडीच्या वतीने विविध योजना आखल्या जात आहे या योजनेच्या माध्यमातून या ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले की ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपॅनेलच्या माध्यमातून लढविल्या जात असल्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्षाचा संबंध येत नाही अनेक लोक आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त निवडणूक विजयी झाले असा दावा करत आहे परंतु मी तसा दावा करणार नाही असे सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा ग्राम विकासाच्या दृष्टीकोनातून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी त्या सत्काराच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
