प्रतिनिधी , मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना माता भगिनींचा दर्जा होता. त्यांचा सन्मान केला जायचा मात्र या सरकारमध्ये एका मंत्र्यांकडून मोठी चूक झालीय.त्या मुलीवर अत्याचार झाल्याचीही चर्चा आहे. पोलीस नीट तपास करत नाहीत. संजय राठोड समोर येऊन खुलासा करत नाहीत. त्यामुळे राज सरकारकडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे स्पष्ट आहे. त्यामुळे कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांचा जनता कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असं शेलार म्हणाले.
