जनतेज न्युज

एखादे विकास कार्य जनसामान्यांसाठी कसे प्राणघातक आणि त्रासदायक ठरू शकते .

प्रतिनिधी , नागपूर : एखादे विकास कार्य जनसामान्यांसाठी कसे प्राणघातक आणि त्रासदायक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूर्व नागपुरातील पारडी उड्डाणपूल. देशाचे परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या मतदारसंघातील पारडी उड्डाणपूल हा नागपुरात आता चर्चेचा विषय बनला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित या उड्डाणपुलाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 वर्षाआधी केले होते. शहरात येणारा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक आणि सोबतच याच परिसरात सर्वात मोठा कामगार वर्ग रहात असल्यामुळे त्यांचा या रस्त्यावरून वावर अश्या दुहेरी गराहेतून हा रस्ता महत्वपूर्ण आहे यातून 200च्या वर लोक या रस्त्यावर मृत्युमुखी पडले होते, 2016 च्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर लोकांना वाटलं की या रस्त्यावर आता प्रवास जीवघेणा ठरणार नाही पण आता या पुलाच्या बांधकामात एवढी उदासीनता आहे की असंख्य लोक या परिसरात जड वाहनांखाली चिरडले जात आहे आणि प्रशासन मात्र कुंभाकर्णी झोपेत आहेत. परिसरात ही देखील चारचा आहे की निश्चितच या पुलाचे बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स परिसरातील आमदार महोदयांसोबतच केंद्रीय मंत्री महोदयांना सुद्धा जुमानत नाही या प्रकरणात परिसरातील विविध पक्षांच्या नेत्यांशीही संपर्क केला असता त्यांनीही यावर आपली मतं व्यक्त केली…