प्रतिनिधी, वर्धा : गेल्या पंधरा दिवसापासून देवळी तालुक्याला अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांना दुबार,तिबार पेरणी करावी लागली तर नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीच खरडून गेली असून अजूनही अनेकांची शेती पाण्यात आहे. त्यामुळे कोवळी पिके मृत पावत आहे. त्यामुळे संपूर्ण देवळी तालुक्यात
1) तात्काळ ‘ओला दुष्काळ’जाहीर करावा.
2) एकरी सरसकट 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी.3)चालू वर्षाचे पीक कर्ज माफ करण्यात यावे.
इत्यादी प्रमुख मागण्यांना घेऊन युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात देवळी तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ते तहसील कार्यालय,देवळी इथ पर्यंत पायी मोर्चा काढत आक्रोश मोर्चा केला.
