जनतेज न्युज

कनेक्शन ‘कट’ कराल तर कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद खाल

प्रतिनिधी , कोलापूर : वाढत्या वीजबिल विरोधात राज्यभरातील जनता, अस्वस्थ आहे.. वीज मंत्र्यांनी केलेल्या घोषणेचा जनतेने चांगलाच धसका घेतलाय..पण या धसक्याला न जुमानता कोल्हापूरकरांनी मात्र, वीज जोडणी तोडाल..तर कोल्हापूरी पायतान खाल असा सज्जड दम महावितरणला कोल्हापूरकरांनी भरलाय.. अशा आशयाचे फलक चौका चौकात लावण्यात आले आहेत..
कोरोना काळात आलेल्या विजबिलांमुळे जनतेची झोप उडाली आहे.. वीज मंत्र्यांनी विजबिलात कोणतीही सवलत न देता.. वीजबिल भरावीच लागतील असे स्पष्ट केले आहे…. मात्र, कोरोना काळात हाताला नसलेले काम, व्यवसायात झालेली घट.. यामुळे वीजबिलात काही प्रमाणात सवलत मिळावी अशी मागणी राज्यभर होत आहेत.. या मागण्यांना केराची टोपली मिळाल्याने..कोल्हापूरकर मात्र या विरोधात आक्रमक झाला आहे..वीज बिल मागाल तर कोल्हापुरी पायतान खाल.. अशा आशयाचे फलक कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे कृती समिती कोल्हापूरतर्फे लावण्यात आले आहेत. वीज जोडणी तोडायला येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद शंभर टक्के मिळेल….यासाठी कोल्हापूरी पायतान मोहीम सुरू करण्यात आली आहे…विजबिल कमी केले नाहीतर जनताच सरकारला त्यांची जागा दाखवेल असे कृती समिती कोल्हापूरचे सदस्य बाबा पार्टे यांनी यावेळी सांगितले..
इतकंच नाही तर…महावितरणचा कोनीही कर्मचारी वीज बिल तोडण्यास आल्यास..आपल्याशी संपर्क साधावा.. यासाठी कृती समितीने आपले मोबाईल नंबर ही जाहीर केले आहेत..