प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली: 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या यानंतर शिक्षकांना करोना टेस्ट बांधनकरक करण्यात आल्याने शुक्रवारी आणि शनिवारी शिक्षकांनी टेस्ट साठी केंद्रावर गर्दी केली होती. मात्र या टेस्टचा अहवाल येण्या आधीच ठाणे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा मुहूर्त 31 डिसेंबर पर्यत लांबला आहे. मागील चार दिवसात कल्याणात 1442 शिक्षकांनी करोना टेस्ट केली असून यातील 440 शिक्षकांचा स्वब अहवाल प्राप्त झाला असून यात 9 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. तर डोंबिवली मधील 981 शिक्षकांनी स्वब तपासणी करून घेतली असून यातील 68 शिक्षकांचा अहवाल प्राप्त झाला आहे यात 2 शिक्षक पॉझिटिव्ह आले असून अद्यापि 1915 शिक्षकांचा अहवाल अप्राप्त आहे. दरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून टेस्टिंगला प्राधान्य देत तपासनि सेंटर वाढविण्यात आली होती मात्र शाळा सुरू होण्याच्या मुहूर्त लांबल्याने आणखी सेंटर सुरू न करता दैनंदिन सुरू असलेल्या कोरोना टेस्टिंग सेंटर वरच शिक्षकांची टेस्ट केली जात असल्याचे साथरोग विभाग प्रमुख डॉ प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले .
