जनतेज न्युज

कशेडी घाटात खाजगी बस दरीत कोसळली…

आठ वर्ष वयाच्या मुलाचा मृत्यू तर पंधरा जण जख्मी..
प्रतिनिधी , मुंबई : मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने खाजगी बस सुमारे पंचवीस फूट खोल दरीत कोसळली भोगाव गावाजवळ आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका आठ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा जण जख्मी झाले. एकूण 31 प्रवासी यामधून प्रवास करत होते मुबंई हून कणकवली येथे निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्स च्या खाजगी बसला हा अपघात झाला दैव बलवत्तर होते म्हणून बस एका झाडावर अडकलेल्या अवस्थेत राहीली म्हणून मोठा अनर्थ टळला. पोलादपूर पोलीस तसेच महाड येथील साळुंखे रेस्क्यू टिम अपघात स्थळी वेळेवरती पोहोचल्याने आत मध्ये अडकलेल्या तीस जणांना सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश आले. जख्मीं वरती पोलादपूर च्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.