जनतेज न्युज

कांद्री येथे शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वीज बिल माफ व धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी केले आंदोलन

प्रतिनिधी , भंडारा : धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, वीज बील माफीचा राज्य सरकारच्या वेगवेगळ्या घोषणाबाजी, त्यावर राज्यातील तमाम जनतेची होत असलेली दिशाभूल, याच्या निषेधार्थ आज मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे विकास फाऊंडेशन व भाजपच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच विजबिलाची होळी करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
, यावेळी भाजप चे माजी आमदार, विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चरण
वाघमारे ,माजी जिप सदस्य चंदू पिलारे, सरपंच परमेश नलगोपुलवार,रवींद्र बाभरे,दिवाकर बोरकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते।