जनतेज न्युज

केंद्रीय कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात आज देशभर काँग्रेसने आंदोलन केले.

प्रतिनिधी , कोल्हापूर : केंद्रीय कृषी कायदे आणि इंधन दरवाढीविरोधात आज देशभर काँग्रेसने आंदोलन केले. कोल्हापूरमध्ये देखील काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलन स्थळी गॅस सिलेंडरची मोठी प्रतिकृती लावून इंधनाचे दर कशा प्रकारे वाढेल हे दाखविण्यात आल. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत त्याचबरोबर इंधनाचे वाढलेले भरमसाठ दर कमी करावेत अशी मागणी करत केंद्राच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला.