जनतेज न्युज

कॉंग्रेस पक्षाचे काळे कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात मुंबई येथे उपोषण

प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारच्या पारित केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने ‘भारत बंद’चं आवाहन केलं आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. यादरम्यान दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिल्ली सिमेवरील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले. पण देशाच्या अन्नदात्याबाबत केंद्र सरकार जणू संवेदनशून्य झाले आहे. केंद्राचे तीनही काळे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. यासाठी आज कॉंग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन सुरु केले आहे.