प्रतिनिधी , धुळे : राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यामध्ये यासंदर्भातील निर्बंध जिल्हाधिकारी संजय यादव जारी करण्यात आले आहेत. धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांना 200 रुपये दंड, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहे.
तसेच खासगी डॉक्टरांकडून नियमितपणे घेणार आढावा घेण्यात यावा. गृह विलगीकरण, अलगीकरणातील रुग्णांची तपासणी करण्यात येणार. बाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 व्यक्तींची चाचणी करावी. विवाह सोहळ्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असून सर्व हॉटेल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच राहणार सुरू राहणार आहेत. हॉटेल मध्ये एकावेळी मिळणार पाच ग्राहकांनाच प्रवेश, प्रवासी वाहनांतील संख्येवर निर्बंध तसेच सार्वजनिक उद्याने पहाटे 5 सकाळी ते 9 पर्यंतच खुली राहणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली.
