प्रतिनिधि , बीड : आज मकरसंक्रांती निमीत्त गेवराई शहरातील प्रसिद्ध चिंतेश्वर मंदिर येथे महिलांनी मोठ्या उत्साहात संक्रांत साजरी केली यावेळी महिलांनी संक्रांत निमित्त एकमेकिंना वाण देत संक्रांतीचा गोडावा कायम रहावा यासाठी चिंतेश्वराचे आशिर्वाद घेतले तालुक्यात मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तालुक्यातील चिंतेश्वर , त्वरितादेवी मंदीरामध्येही महिलांनी संक्रांत सण साजरा केला.यावेळी जगावर आलेल्या भयंकर अशा कोरोना महामारी पासुन संपूर्ण जगाला मुक्ती मिळो तसेच असे संकट पुन्हा जगावर येवु नये अशी मागणी महिलांनी संक्रातीनिमीत्त केलीय.
