जनतेज न्युज

क्रांतिदिनी आयटक व भाकपची निदर्शने

प्रतिनिधी: ९ ऑगस्ट ला क्रांती दिन हा भारत बचाव दिन म्हणून आयटक व भाकपच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून साजरा करण्यात आला.
केंद्रीय कामगार संघटना व संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आवाहना नुसार ९ ऑगस्ट क्रांती दिन हा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, किसान विरोधी व जनविरोधी धोरणाच्या विरोधात – भारत बचाव दिन म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते.
निवेदनात कामगार विरोधी चार श्रमसंहिता, शेतकरी विरोधी तिन काळे कायदे आणि जनविरोधी वीज संशोधन बिल रद्द करा.सरकारी व सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण व विनिवेश बंद करावे , आवश्यक वस्तू पेट्रोल, डिझेल ,गॅस,विज इत्यादींच्या वाढलेल्या किमती कमी करण्यात याव्या तसेच कोरोना काळात विद्याथ्र्यांची संपूर्ण फी माफ करा. त्याचबरोबर स्थानिक मागण्यात कोरोना महामारी च्या भीषण संकटाच्या काळात कोरोना रूग्णांना सेवा देणा-या कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचारी ,आरोग्य सेवक, इत्यादींना पुनर्नियुक्ती आदेश देऊन पूर्ववत कामावर रुजू करण्यात यावे. तसेच रिक्त पदावर कायम सेवेत सामावून घेण्यात यावे इत्यादी २० मागण्यांना घेवुन हे आंदोलन करण्यात आले.