प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : राज्य सभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील खूप चर्चेत आले होते आणि त्यांचे मत भाजपला गेल्याची खुप चर्चा होती. मात्र काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरू नये, भाजपला मतदान करणार आहोत की दुसऱ्या पक्षाला. लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य असून तुम्ही पाहिलं आहे एका मताला महत्व असतं. राज साहेबांनी निर्देश दिलेले आहेत, त्याप्रमाणे मतदान होईल, असे राजू पाटील म्हणाले.
