जनतेज न्युज

गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली नाहीये.

प्रतिनिधी , कोलापूर : गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण झाली नाहीये. योजनेचे काम सुरुवातीपासूनच संथगतीने सुरू असल्याने आमच्या हक्काचं पाणी आम्हाला कधी मिळणार या मागणीसाठी कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली महिलांनी जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाच्या आणि संबंधित ठेकेदाराच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आम्हाला योजना कधीपर्यंत पूर्ण करून देणार याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत जिल्हापरिषदेसमोरून हटणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सदस्या वंदना मगदूम यांनी सुद्धा आंदोलकांच्या पाठीशी असून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.