प्रतिनिधी, जळगाव ; चोपडा शहरातील प्रत्येक रस्त्यांची अवस्था ही बिकट झाली आहे परंतु चोपडा शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते चिंच चौक या मार्गाने माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानाकडे जाणारा हा रस्ता आहे. अरुण भाई गुजराती हे आमदार व मंत्री असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दहा जूनच्या आधी नगरपालिका उद्यानापासून ते अरुण भाई गुजराती यांच्या निवासस्थाना पर्यंत रस्त्याची डागडुजी केली जात होती. परंतु गेल्या सात आठ वर्षापासून हा रस्ता ट्रिमिंक्स झाल्याने याच्यावर अनेक वर्षांपासून खड्डे पडलेले आहे.
परंतु या खड्ड्यांची डाग डुगी केली जात नसल्याने या रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे झाल आहे. वर्दळीचा असलेला या रस्त्यावर पडलेले खड्डे व लहान मोठे होणारा अपघात नगरपालिका प्रशासनाला व आधी पदाधिकाऱ्यांना दिसला नसावा का असा संताप नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहे ट्रिमिक्स रस्ते करण्यापेक्षा डांबरी रस्ते करावे अशी मागणी देखील नागरिकांकडून होत आहे लवकरात लवकर या रस्त्याची डागडुजी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे.
