प्रतिनिधी, बीड : हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा.हा दुष्काळग्रस्त जिल्हा आणि मागासलेला जिल्हा.मात्र आता याच जिल्ह्यात महिला आपलं कर्तृत्व गाजवून आपल्या क्षेत्रात ठसा उमटवित आहेत. बीड शहरात मुलींना फिटनेसचे धडे देणाऱ्या या आहेत. प्रीती सानप. मागील चार वर्षांपासून त्या बीड सारख्या दुर्गम भागात फिटनेस बाबत महत्त्व पटवून देत आहेत. एक महिला म्हणून सुरुवातीला टीका झाली. मात्र या टीकेला न जुमानता त्यांनी आपलं कार्य सुरु ठेवलं. आज त्यांनी या फिटनेस इंडस्ट्रीत नाव कोरले आहे.राज्यात सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपा दरम्यान महामंडळाकडून महिला कर्मचाऱ्यांवर देखील बडतर्फीची कारवाई केली गेली. बीड आगारात 2014 पासून सेवा देणाऱ्या रत्नमाला साळुंखे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईनंतर साळुंखे यांनी पर्याय म्हणून घरातील शिलाई मशीन वरील धूळ बाजूला सारत शिवण कामाचा व्यवसाय सुरू केला. मागील चार महिन्यांपासून त्यांचं मानधन थकलेल आहे. कुटुंबाला हातभार लावून त्यांनी एसटी संपात देखील सहभाग सुरूच ठेवला आहे.
