प्रतिनिधी, चंद्रपूर : शहरालगत मोरवा गावातील घटना, पडोली पोलिसांनी 2 आरोपींना केली अटक,पैशाच्या वादातून झाले भांडण, पाठीवर भला मोठा दगड बांधून विहिरीत फेकले, पोलीस करत आहे अन्य आरोपींचा तपास.पैशाच्या वादातून युवकाला मारहाण करत पाठीवर दगड बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील मोरवा गावात घडली. या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पंचनामा करत मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. संदीप गीवे असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेत पडोली पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. संदीप गिवे या युवकासोबत गावातीलच काही युवकांचे पैशाच्या वादातून भांडण झाले.त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की गावातील काही युवकांनी संदीप गिवे याला मारहाण करत त्याचे हात पाय बांधले. मात्र आरोपी इथेच थांबले नाही तर संदीप च्या पाठीवर भला मोठा दगड बांधून त्याला विहिरीत फेकले. हत्या प्रकरणातील अन्य आरोपी फरार झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
