प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूर केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत, पण जोपर्यंत तीन कायदे मागे घेण्यात येत नाहीत, शेतमालाच्या हमीभाव बाबत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे संकेत माजी खासदार राजू शेट्टींनी दिलेत.जर किमान वेतन कायदा होऊ शकतो तर हमीभाव कायदा का होऊ शकत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
