जनतेज न्युज

जिल्हा पोलीस दल भागवत आहे वाटसरूची तहान, 30 ठिकाणी पाणपोई चे उदघाटन

प्रतिनिधी, नंदुरबार : कम्युनिटीग पोलिसिंग अंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दल व वाहतूक शाखेच्या वतीने आज नंदुरबार येथील बसस्थानक परिसरात पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या पाणपोईचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, नगरसेवक परवेज खान, दीपक कटारिया ,व परिसरातील नागरिक उपस्थित होते .उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना पाण्याची सोय व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दल जिल्हाभरातील  विविध 30 ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन केले आहे. प्रवासी व सामान्य जनतेला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही यासाठी पाणपोई चे उदघाटन केले आहे. पोलीस विभागामार्फत ज्या ठिकाणी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले आहे त्याची सर्व देखरेख जिल्हा पोलीस दल करणार आहे.असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सांगितले.