जनतेज न्युज

जिल्हा विद्युत कत्रांटदार संघटनेच्या वतीने कामबंद धरणे आंदोलन

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा  महावितरण कार्यालयासमोर आज दुपारी 2 वाजेपासून बुलडाणा जिल्हा विद्युत कत्रांटदार संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी कामबंद धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कामगार या ठिकाणी आले आहे.हे आंदोलन बुलडाणा जिल्हा कंत्राटदार संघटनाचे जिल्हाअध्यक्ष निलेश देशमुख व महाराष्ट्र राज्य विद्युत कत्रांटदार महासंघांचे जिल्हाअध्यक्ष रामेश्वर निंभोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. विद्युत  कंत्राटदार हा महावितरणचा अविभाज्य घटक असून वादळ, वारा, पाणी व कोवीडच्या महामारी अशा विपरीत परिस्थतीत सुद्धा विद्युत लाईनची कामे तन मन धनाने रात्री अपरात्री पूर्ण करत आहे.ग्राहकांना सेवा देण्याचे काम करतात. मागील 7 ते 8 महिन्यापासून विविध योजनांच्या केलेल्या कामांची उदा. मेंटेंनन्स, ब्रेकडाऊन, एचव्हीडीएस (कृषी पंप) एन.एस.सी. च्या बिलांचे पेमेंट अजून पर्यंत मिळाले नाही त्यामुळे कंत्राटदारावर उपासमारी तसेच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आज बाजारामध्ये स्टील,कॉपर, अॅल्युमिनियम,सिमेंट अशा सर्व मटेरियलचे भाव प्रचंड वाढलेले आहे. अशा परिस्थिती महावितरण मध्ये सन 2019 च्या जुन्याच दराप्रमाणे रेट देण्यात येते आहे. अशा परिस्थितीमध्ये काम करणे अवघड आहे त्यामुळे विद्युत कंत्राटदाराचे  मानसिक,आर्थिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे आजपासून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये महावितरण मधील काम करणारे कंत्राटदार जोपर्यंत आतापर्यंतचे थकीत बिलाचे पेमेंट मिळत नाही व तसेच दरसुची कॉस्ट डाटा बाजारभावानुसार वाढत नाही तोपर्यंत काम बंद करणार आहे असे सांगितले आहे.या आंदोलनात  बुलडाणा जिल्हा कंत्राटदार संघटनाचे जिल्हाअध्यक्ष निलेश देशमुख, महाराष्ट्र राज्य विद्युत कत्रांटदार महासंघांचे जिल्हाअध्यक्ष रामेश्वर निंभोरे, रमेश खेडेकर, दिपक घुनके,सुलताने शेळके, गजानान जोशी, नंदकिशोर देशमुख, विशाल सपकाळ, मंगेश बायस्कर, गजानन जाधव, राजु टेकाडे,शालीक खेडेकर, भास्कर बावस्कर गौरव सोनुने आदी लोक सहभागी होते.