प्रतिनिधी , ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाण्यात जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट तयार करण्यात आले आहे. पुढील २ दिवस हे भव्य पोट्रेटच पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असून याकरता विशेष व्यवस्था करण्यात आलीये.
ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात १० तरुणांनी ३ दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे.सकल मराठा संस्थेमार्फत हे भव्य पोट्रेट बनवले गेले आहे.या पोट्रेटचे मुख्य मोझॅक कलाकार है चेतन राऊत असून त्यांनी या पोट्रोट करता ५० हजार दिव्यांचा वापर केलाय.ज्यात हिरवा, काळा, निळा, लाल, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे हे दिवे आहेत.३० फुट बाय ४० फुटांचे हे पोट्रेट असून २० फुटांवरुन सोशल मिडिया डिसटन्ससिंगचे नियम पाळून नागरिकांना हे पोट्रेट पहायला मिळणार आहे. १८, १९ आणि २० फेब्रुवारी हे पुढील तीन दिवस हे पोट्रेट पाहण्याचा आनंद नागरीक लुटू शकतात.
