प्रतिनिधी , शिर्डी : दोन दिवसांपूर्वी शिर्डीच्या दंडाधिकार्यांनी नोटीस काढून तृप्ती देसाईंना शिर्डीच्या हद्दीत प्रवेशबंदी केलीये… मात्र देसाई आपल्या भूमिकेवर ठाम असून, साई संस्थानने लावलेले फलक हटवण्यासाठी शिर्डीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत… त्यामुळे शिर्डीत पोलीस प्रशासनाकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.त्याचबरोबर भाजप महिला आघाडी ,शिवसेना महिला आघाडी आणि ब्राम्हण महासभेचे पदाधिकारी हे साईमंदिराचे गेट क्रमांक ४ समोर बसून साईबाबांच्या माध्यन आरती मध्ये सामील झाले होते. तृप्ती देसाई या जर साईदर्शनासाठी येत शिर्डीत येत असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल मात्र त्या जर फलक काढण्यासाठी येत असेल तर त्यांच्या तोंडाला आम्ही काळ फासू असे आव्हानं महिलांच्या वतीने करण्यात आलं होतं मात्र तृप्ती देसाई याना अहमदनगर जिल्हा शिवावर पोलिसांच्या पथकाकडून ताब्यात घेतल्याने शिर्डी साईमंदिर परिसरात शिवसेना महिला आघाडी ,ब्राम्हण महासभेचे पदाधिकारी ,भाजपा महिला आघाडी त्याच बरोबर शिर्डी ग्रामस्थांनी फटाके फोडत पेढे वाटून जल्लोश साजरा केलाय .
